Saturday , December 3 2022
Breaking News

हिमायतनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदार यादी पारदर्शकपणे होईल याची पुरेपूर दक्षता घेण्यात येईल : मुख्याधिकारी शामकांत जाधव

लिंगोजी कदम तालुका प्रतिनिधी हिमायतनगर जि नांदेड

हिमायतनगर :- नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम-2022 जाहीर केलेला असून, दि.31 मे 2022 रोजीपर्यंत अद्यावत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिमायतनगर नगरपंचायत हद्दीतील यादीभाग क्रमांक 127 ते 141 चे प्रभागनिहाय विभाजन करून प्रभाग क्रमांक 1 ते 17 या प्रभागाची प्रारूप मतदार यादी दि.21 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील प्रारूप मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली असल्यास त्याबाबत दि.21 जून 2022 ते 27 जून 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी विहित केला होता. विहित कालावधीत 1 ते 17 प्रभागातील प्राप्त झालेल्या मतदारांच्या आक्षेप अर्जाची प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यासाठी नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे तीन पथक स्थापन केले असून, सदरील कर्मचारी पथकामार्फत शहरातील प्रभागनिहाय प्राप्त आक्षेप अर्जांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून जिओ टॅग प्रणालीमध्ये फोटो घेऊन आक्षेप अर्जांची चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येत आहे व तसेच एक-गठ्ठा स्वरूपात प्राप्त झालेल्या सार्वजनिक स्वरूपातील मतदारांच्या नावांची शहानिशा करण्यात येत आहे. जे मतदार ज्या प्रभागात वास्तव्यास आहेत त्यांची नावे त्याच ठिकाणी राहतील याची पुरेपूर दक्षता घेण्यात येत असून, मतदार यादीचे काम अत्यंत पारदर्शकपणे व योग्यरित्या होत असल्याचे मुख्याधिकारी शामकांत जाधव यांनी सांगितले. प्रारूप मतदार यादीचे काम प्राधिकृत अधिकारी किर्तीकिरण पुजार (भा.प्र.से.) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किनवट यांचे मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी शामकांत जाधव, कार्यालय अधिक्षक चंद्रशेखर महाजन, बाळाजी माळचापुरे, रमाकांत बाच्छे, रत्नाकर डावरे, मारोतराव हेंद्रे, बालाजी हरडपकर, विठ्ठल शिंदे, श्यामसुंदर पाटील, शेख यासीन, श्याम मंडोजवार यांच्यामार्फत करण्यात येत आहे. दि.5 जुलै 2022 रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होईल व तसेच दि.9 जुलै 2022 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होईल असे मुख्याधिकारी शामकांत जाधव यांनी सांगितले.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक मध्ये खासदार भव्य रोजगार मेळावा.

सुराज्य न्युज /अमोल चव्हाण https://forms.gle/rTFcVjCEbjoVThix9 नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री.हेमंत जी गोडसे साहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: