Thursday , December 8 2022
Breaking News

राजीव गांधी उड्डाणपुलावर शाॅर्टसर्किटने लागली आग

मनिष मसुरकर विशेष प्रतिनिधी ठाणे जिल्हा
सुराज्य न्युज
मो.नं. : ८८७९३७३१६४

ठाणे (भिवंडी) : सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, भिवंडीतील स्व.राजीव गांधी उड्डाणपुलावर संरक्षण कठड्याच्या खालील बाजूकडून विद्युतपुरवठा करणार्‍या केबलला आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. सुदैवाने पाऊस आला आणि मोठी दुर्घटना टळली.

आगीत विद्युत वायर जळत असताना उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरु होती. आगीच्या ठिणग्या वाहनांवर पडत होत्या. एखाद्या वाहनाने पेट घेतला असता दुर्घटना घडली असती. खालील मार्गावर सीएनजी गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक त्याठिकाणाहून रवाना झाला होता.

याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी गुरुचरण पंडुरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांना आगीची कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगीच्या घटनेत जळालेली केबल भिवंडी महापालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला.

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: