Thursday , December 8 2022
Breaking News

अन्यथा विक्रीची वाहने जप्त करणार: आयुक्त.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- मालेगाव शहरातील मुन्सिपल हायस्कूलच्या बाहेरील रस्त्यालगत दुचाकी विक्रेत्यांची दुकाने आहेत. हे विक्रेते विक्रीच्या दुचाकी रस्त्यावर उभ्या करीत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी थेट दुचाकी विक्रेत्यांची भेट घेत त्यांना विक्रीच्या दुचाकी व्यवस्थीत उभ्या करा; अन्यथा विक्रीचीच वाहने जप्त केल्या जातील, असा इशारा दिला.

आयुक्त गोसावी यांनी शहरातील पूर्व भागात फेरफटका मारला. यावेळी मुन्सिपल हायस्कूलसमोर असलेल्या वाहन बाजारासमोर अनेक दुचाकी रस्त्यावर उभी असल्याचे निदर्शनात आल्यानंतर आयुक्त गोसावी यांनी विक्रेत्यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना दुचाकी व्यवस्थीत उभ्या कराव्यात, वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी आदी सूचना केल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त राजू खैरनार, सुनील खडके, सचिन महाले आदी उपस्थित होते.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: