Saturday , December 3 2022
Breaking News

गट वृक्ष लागवड योजनेची १०० टक्के रोपे जिवंत

झरप, ता. लाखनी येथील प्रकार

सामाजिक वनीकरण विभागाचा स्तुत्य उपक्रम

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा

भंडारा :- पर्यावरणाचा समतोल अबाधित रहावा याकरिता सामाजिक वनीकरण विभागाचे वतीने राज्य योजने अंतर्गत झरप येथे २०२१ मध्ये गट वृक्ष लागवड केलेल्या मिश्र रोपवनातील सर्वच ३ हजार ८८८ झाडे जिवंत असल्यामुळे साकोली परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.के. बेलखोडे व वनपाल प्रमोदकुमार फुले, स्थायी वन मजूर प्रेम विलास भुजाडे यांचे स्तरातून कौतुक होत असल्याच्या तालुक्यात चर्चा होत असून इतरांनीही यापासून बोध घेणे आवश्यक आहे.
अवैध वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे मार्गावर आहे. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पाचवीला पुजलेले असते. यावर रामबाण उपाय म्हणजे वृक्ष लागवड व संवर्धन असल्याचे शासनाचे निदर्शनास असल्याने शासकीय पडीक जमीनीवर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडे स्वतःचे वनक्षेत्र नाही किंवा जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामपंचायत, महसूल अथवा वन विभागाच्या अखत्यारीतील पडीक जागेची मागणी करून त्यात वृक्ष लागवड केली जाते. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली जाते.
सामाजिक वनीकरण विभाग भंडारा परिक्षत्र साकोली चे वतीने लाखनी तालुक्यातील झरप येथे २०२१ मध्ये गट क्रमांक २७०/१ आराजी ३.५० हेक्टर आर मध्ये मिश्र रोपवन गटवृक्ष लागवड योजने अंतर्गत करण्यात आले आहे. त्यात आवळा, शिशु, कडुनिंब, करंज, वड, पिंपळ इत्यादी प्रजातीची ३ हजार ८८८ रोपे लावण्यात आली होती. सहाय्यक वनसंरक्षक तथा प्रभारी विभागीय वन अधिकारी संदीप क्षिरसागर यांचे मार्गदर्शनात व वन परिक्षेत्र अधिकारी व्ही.के. बेलखोडे यांचे निर्देशानुसार वनपाल प्रमोदकुमार फुले, स्थायी वनमजूर प्रेम विलास भुजाडे यांचे देखरेख व सनियंत्रणात मिश्र गटवृक्ष लागवड करण्यात आली. अंदाजपत्रकिय रक्कम ३ लाख ७ हजार ५०० रुपये होती. अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार सामाजिक वनीकरणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने देखभाल केली. तथा वेळोवेळी आवश्यक त्या खताच्या मात्रा दिल्याने लागवड केलेली सर्वच्या सर्व ३ हजार ८८८ झाडे जिवंत असून उंची १ ते २ फूट आहे. यात सहभागी सर्व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत असल्याच्या तालुक्यात चर्चा होत आहेत.

About किरण सोनवणे

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: