Sunday , November 27 2022
Breaking News

इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करणे होणार आता आणखी सोप्पे; राज्यसरकार देणार १.५ लाखांपर्यंतचे प्रोत्साहन…

सुराज्य न्युज / नाशिक प्रतिनिधी

नाशिक:- दिवसेंदिवस वाढत चाललेली इंधन वाढ आणि प्रदूषण यामुळे संपूर्ण जगात इलेक्ट्रिक वाहनांना (electric vehicle) अधिक पसंती दिली जात आहे. परंतु इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती जास्त असल्याने खरेदीदारांना इलेक्ट्रिक वाहन घेणं आवाक्याबाहेर वाटत आहे. यामुळेच भारतात केंद्रसरकार (central Goverment) इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रामध्ये सुधारित महाराष्ट्र इव्ही धोरण २०२१ मध्ये जाहीर झाले होते. या धोरणानुसार ईव्हींना नोंदणी शुक्ल आणि रोड करातून सवलत देण्यात आली असून राज्याला इलेक्ट्रिक वाहनांचे भारतातील सर्वोच्च उत्पादक बनवण्याचे उद्दिष्ट आहे.राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी देण्यात येणारे अनुदानमहाराष्ट्र राज्य ३१ मार्च पूर्वी ३ kWh बॅटरी असलेली इलेक्ट्रिक बाईक घेणाऱ्या व्यक्तीसाठी १५ हजार रुपयांपर्यंतचा अर्ली बर्ड बोनस देत आहे. इलेक्ट्रिक कारसाठी ३० kWh पर्यंत बॅटरी क्षमता सवलती साठी पात्र असून यासाठी एकूण रु. १.५ लाख पर्यंतचे प्रोत्साहन मिळते. ३१ मार्चपूर्वी खरेदी करणाऱ्यांना १ लाख रुपयांच्या अतिरिक्त प्रोत्साहानासह अनुदान मिळत आहे.२५०० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे लक्ष्य

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग (Charging) असणे आवश्यक आहे ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने पुढील चार वर्षात सात शहरांमध्ये २,५०० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे लक्ष्य राज्याने ठेवले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहने वापरणे हे सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

युक्रेन मध्ये अडकलेल्या नाशिक च्या विद्यार्थ्यांची संख्या चारवर.. आणखी 2 विद्यार्थी युक्रेन मध्ये..

सुराज्य न्युज /नाशिक प्रतिनिधी नाशिक :- रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. मेडिकलच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: