Thursday , December 8 2022
Breaking News

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल धडगाव (सलसाडी) शाळेचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

रविंद्र वसावे विशेष प्रतिनिधी नंदुरबार

आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल शाळांच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत तळोदा प्रकल्पातील धडगाव सध्या सलसाडी येथे सुरु असलेल्या एकलव्य शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य ईश्वर दौंड यांनी दिली.या स्पर्धेत 33 मुली 32 मुले असे एकूण 65 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांची आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत शाळेने विविध खेळात यश मिळवले आहे.शाळेला ३ सुवर्णपदके, ४ रजत पदके व ४ कास्य पदके मिळालेली आहेत. राज्यस्तरीय सांघिक खेळामध्ये खो खो U19 मुलींच्या संघाने 4 वेळा नॅशनल खेळलेल्या पिंप्री संघाला चुरशीची लढत दिली व उपविजेता राहिला. यशस्वी खेळाडूंना तळोदा प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे,प्राचार्य ईश्वर दौंड यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. क्रीडा शिक्षिका हतरी पावरा, श्री राजु मुखडे ,श्री योगेश भारती ,श्री किशोर बारीकराव,श्री सुनिल गावित सर,सुजाता ठाकरे, मुकेश बारीकराव शाळा समितीचे अध्यक्ष, सदस्य,विद्यार्थ्यांचे पालक तसेच शिक्षक नवनाथ ठाकरे,मनेश पाडवी,प्रकाश ठाकरे,सुरेश ठाकरे,हेतनकुमार वळवी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्या बाबत आवाहन

 मालेगाव शहर प्रतिनधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र मालेगाव (२७ नोव्हेंबर २०२२): अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: