Saturday , December 3 2022
Breaking News

कुही शहरात पंचायत समिती कुही भवनात कृषि दिन संपन्न

रमेशभाऊ लांजेवार जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नागपुर 

नागपूर :- माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांची जयंती *कृषी दिन* म्हणून साजरी करण्यात आली.
दिनांक १ जुलै २०२२ रोजी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कुही यांचे संयुक्त विद्यमाने कै वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून पंचायत समिती सभागृह कुही येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ अश्विनीताई शिवनकर सभापती प स कुही होते. प्रमूख उपस्थितीत मा श्री वामनराव श्रीरामे उप सभापती प स कुही, सौ वंदनाताई मोटघरे प सदस्य, सौ साखरवाडे मैडम जि प सदस्य , सौ डहारे मैडम प सदस्य , श्री इस्तारी तळेकर प स सदस्य, श्री हिरुडकर खंड विकास अधिकारी प स कुही,  सौ निता घोरसे कृषी अधिकारी (ताकृअ कुही), श्री भेंडे कृषी अधिकारी प स कुही उपस्थित होते.
कृषी दिन कार्यक्रमात प्रगतशील शेतक-या चा व पिक स्पर्धेत अधिक उत्पादन घेतलेल्या शेतक-या चा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शेतक-या नी उत्पन्न पिकाचे योग्य नीयोजन करावे वामनराव श्रीरामे यांनी मत व्यक्त केले.
खंड विकास अधिकारी श्री हिरुडकर साहेब यांनी मग्रारोहयो अन्तर्गत शेतकरी लखपती झाला पाहिजे या साठी एकत्मीक पणे सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
सौ शिवनकर मैडम यांनी शेतक-या नी   बिज प्रक्रिया करुन पिक पेरनी करावी. असे आवाहन केले.
मंडळ कृषी अधिकारी कुही सौ भातखोरे मैडम यांनी २५ जून ते १ जुलै कृषी संजीवनी सप्ताह अन्तर्गत घेतलेल्या कार्यक्रमा ची माहिती दिली.
या कार्यक्रमा चे सूत्रसंचालन श्री सचिन ताकसांडे (BTM आत्मा) यांनी केले. श्री आर बी सोरदे कृषी पर्यवेक्षक कुही यांनी प्रास्ताविक केले तर श्री एस व्ही पहापळे मंडळ कृषी अधिकारी मांढ़ळ यांनी आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विस्तार अधिकारी (प.स.) , कृषी सहाय्यक/सेवक यांनी सहकार्य केले.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक मध्ये खासदार भव्य रोजगार मेळावा.

सुराज्य न्युज /अमोल चव्हाण https://forms.gle/rTFcVjCEbjoVThix9 नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री.हेमंत जी गोडसे साहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: