Thursday , December 8 2022
Breaking News

जिल्हा परिषद शाळा बागाईत पांधी येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

मनोहर देवरे करंजाड प्रतिनिधि सुराज्य न्युज महाराष्ट्र

करंजाड(१५ नोव्हेंबर २०२२)जिल्हा परिषद शाळा बागाईत पांधी येथे महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बिरसा फायटर्स चे राज्य सचिव संजय दळवी, सामाजिक कार्यकर्ते जयवंत पवार तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

याप्रसंगी संजय दळवी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक निलेश देवरे यांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांची आणि कार्याची महती सांगितली. शाळेच्या मुलांना संजय दळवी, जयवंत पवार यांच्या मार्फत शालेय साहित्य तसेच बिस्किटं वाटप केलीत.

कार्यक्रमासाठी बिरसा फायटर्सचे नाशिक जिल्हा अध्यक्ष उमाकांत कापडणीस, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शेखर बच्छाव, महासचिव दादासाहेब खरे, भारतीय ट्रायबल पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष भरत बोरसे, तालुकाध्यक्ष छोटू दळवी, सरचिटणीस देवसिंग पिंपळसे, शहराध्यक्ष दत्तू माळी शाळेच्या शिक्षिका सुरेखा देवरे, सविता कापडणीस तसेच दावल बोरसे, उखा बोरसे यांसह परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुरेखा देवरे यांनी केले.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: