Saturday , December 3 2022
Breaking News

चोरट्यांनी दोन चंदनाचे झाडे कापुन नेल्याची घटना.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- भोसला मिलीटरी कॉलेजच्या आवारातून चोरट्यांनी दोन चंदनाचे झाडे कापून नेल्याची घटना घडली आहे. नाशिक शहरात पुन्हा चंदन चोर सक्रिय कॉलेज आवारातील पंडीत नेहरू भवन बिल्डींग समोरील व आवारातील दाट झाडींमधील झाडे चोरट्यांनी कापून नेले. या झाडाच्या खोडाची किंमत दहा हजार रूपये असल्याचे सांगण्यात आले.

ही घटना गेल्या मध्यरात्री घडली. या चोरीप्रकरणी दत्तू दगडू माळी यांनी तक्रार दाखल केली. असून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक मोहिते अधिक तपास करीत आहेत.

About किरण सोनवणे

Check Also

निफाड तालुक़ा राष्ट्रवादी युवकच्या वतीने अब्दुल सत्तरांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

मनिष शेलार बागलाण (सटाणा) सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (७ नोव्हेंबर २०२२)- आदरणीय सुप्रिया ताई सुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: