Thursday , December 8 2022
Breaking News

देवळाने गावात यात्रा उत्सव साजरा

सुराज्य न्युज /बागलाण प्रतिनिधी

बागलान : देवळाने गावात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सव साजरा करण्यात आला.
सदर दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारी नियमाचे पालन करून यात्रा व दर्शनास मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. या नवीन वर्षात महाशिवरात्री निमित्ताने देवळाणे गावात काल दिनांक 28 फेब्रुवारी रोजी शिव पालखी मिरवणूक काढण्यात आली असून आज दि. 1 मार्च रोजी छोटीशी यात्रा भरवण्यात आली महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिव दर्शनासाठी येणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातून शिवभक्तांनी दर्शनाचा आनंद घेतला.

या छोट्याशा यात्रा स्वरूपात भरवलेला महाशिवरात्रि चा कार्यक्रम सुरळीत व्हावा म्हणून जायखेडा पोलीस स्टेशनचे पो. हवा/ राजेश सोनवणे. पो.नाईक / बाळा पाटील पो.कॉन्स्टेबल / किशोर सूर्यवंशी यांच्यासोबत ग्रामपंचायत पंच सरपंच व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील नागरिक व युवा पिढी यांनी या यात्रेत सहभाग घेऊन शक्यतो कुठे गर्दी होणार नाही याची काळजी घेत यात्रा आनंदाने पार पाडली.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: