Thursday , December 8 2022
Breaking News

दावडी येथे दोन दिवसांत दोन वीज पंपाची चोरी

रवि म्हसाडे(पुणे) प्रतिनिधी सुराज्य न्युज महाराष्ट्र.

राजगुरूनगर पुणे (६ नोव्हेंबर २०२२)- खेड तालुक्यातील दावडी शिवारातील कॅनॉल वरील वीजपंप चोरीस गेल्याची घटना घडली आहे.
या बाबत माहिती अशी की शेतकरी श्री. निलेश लोणकर शुक्रवारी सकाळी आपली वीज पंप (मोटार) चालू करण्यासाठी गेले असताना कॅनॉल वरून वीज पंप गायब झाल्याचे निदर्शनास आले. आजूबाजूला पाईप,वायर अस्तव्यस्त पडलेली दिसून आले. कॅनॉल वर वीजपंप (मोटार) दिसून आली नाही.त्यावरून वीज मोटारीची चोरी झाल्याचे आढळून आले.
तसेच शेतकरी श्री. किरण टाकळकर हे रविवारी सकाळी मोटार चालू करण्यासाठी गेले असताना त्यांची ही मोटार चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: