Saturday , November 26 2022
Breaking News

ओझर (मिग) येथे करिअर मार्गदर्शन सेमिनार संपन्न

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र 

उज्ज्वल भविष्यासाठी योग्य क्षेत्राची निवड व परिश्रम आवश्यक : आसिफ शेख

ओझर (मिंग ) (२९ ऑक्टोबर २०२२) – दि.२७ ऑक्टोबर रोजी ओझर (मिग) एज्युकेशन कमेटी च्या वतीने चांदनी चौक, ओझर येथे १०वी, १२वी व पदवीधर विद्यार्थी व पालकांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजित करण्यात आले होते. मुख्य वक्ते म्हणून आसिफ शब्बीर शेख, करिअर काऊन्सलर यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या करिअरच्या संधी व त्यासाठी कोणत्या शाखेमध्ये शिक्षण घ्यावे, कोर्सचा कालावधी व फी या सर्व बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य क्षेत्राची निवड व परिश्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सगितले.  शिक्षण व करिअर संबंधीत विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कयूम शेख नाशिक, असलम सर, नईम मुल्ला , हाजी फरीद अत्तार, मन्नू शहा, शब्बीर खाटीक, आमीन पठान, बाबा पठान,हाजी अशर्फ तंबोली, डॉ.समीर खाटीक, डॉ. आरिफ मंसूरी, डॉ.रोशनी खाटीक,यांनी विशेष परिश्राम घेतले.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील स्तृत्य उपक्रम

सुराज्य न्युज/ रुपाली मेश्राम लाखणी:-राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील बी. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: