Sunday , November 27 2022
Breaking News

भूतमुगळी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक डी.बी.गुंडूरे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सुराज्य न्युज/द्रोणाचार्य कोळी

निलंगा : जिल्हा परिषद लातूर च्या वतीने सन 2020 -21 या दोन वर्षाचे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शनिवार दि.19 मार्च रोजी जिल्हा परिषद लातूर येथे करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पालक मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार रमेशअप्पा कराड, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल प्राचार्य अनिरुद्ध जाधव अरविंद पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.लातूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या बाला उपक्रमाअंतर्गत सर्व घटकांची पुर्तता करून जिल्ह्य़ातील पहीली पथदर्शी शाळा बनवली असल्याकारणाने लातूर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्य़ातील अनेक शिक्षक, अधिकारी व व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी भुतमुगळी शाळेस भेट देऊन पाहणी करून त्यांच्याही शाळेत बाला चा भुतमुगळी पॅटर्न राबविले आहे .गेल्या तीन वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या 80 विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे. गावातील एकही मूल आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात नाही.तसेच गेल्या तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेत लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शिष्यवृत्तीसाठी पात्र व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यी या शाळेचे असून सन 2021 या वर्षांचा शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा 100% निकाल असणारी जिल्ह्य़ातील एकमेव शाळा आहे. असे अनेक उपक्रम शाळेत राबवून भुतमुगळी शाळेला एक माॅडेल स्कूल बनवण्याचे काम गुंडूरे डी.बी.यांनी केले आहे.या सर्व बाबींचा विचार करून लातूर जिल्हा परिषदेने श्री गुंडूरे ज्ञानदेव भीमराव यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यामुळे परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे.

About जगन जाधव

Check Also

तरसाळी येथे सालाबादाप्रमाणे व परंपरेनुसार तुळशी विवाह मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी : विशाल आंबेकर सुराज्य न्यूज  महाराष्ट्र बागलाण बागलाण( ६ नोव्हेंबर  २०२२) – बागलाण तालुक्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: