Thursday , December 8 2022
Breaking News

आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ऑपरेशन थिएटर तीन वर्षांपासून बंदच

आरोग्य विभागाचे कमालीचे दुर्लक्ष…

हदगाव प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र गजानन जिद्देवार

हदगाव(७ नोव्हेंबर २०२२) : हदगाव तालुक्याचे माजी प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी आणि तालुक्याचे कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया सर्जन असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एल. कदम यांच्याच आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रातील जूने, नवे दोन्ही ऑपरेशन थिएटर मागील तीन वर्षांपासून बंदच असल्याने येथील कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया अक्षरशः बंदच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, जिल्हा व तालुका आरोग्य विभागाचे कमालीच्या दुर्लक्षाने रूग्णांची हेळसांड होत आहे.
हदगाव तालुक्यातील आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्व सोयीनीयुक्त भव्य इमारत बांधण्यात आली. इमारतीबरोबरच सुसज्ज ऑपरेशन थिएटर बांधण्यात आले होते. परंतु जूने ऑपरेशन थिएटर दुरुस्तीला आल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार नांदेड जिल्हा परिषदेने तीन वर्षांपूर्वी दुरुस्तीऐवजी नवीन ऑपरेशन थिएटर बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला होता. परंतु ज्या गुत्तेदराला हे काम देण्यात आले होते. त्या गुत्तेदारांने ऑपरेशन थिएटरचे काम अर्धवट ठेवून बिले लाटल्याचा धक्कादायक प्रकार केल्याचे सांगण्यात आले. असे असताना आरोग्य विभागाच्या कोणत्याही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी नव्या ऑपरेशन थिएटरचे बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री करण्याची व ऑपरेशन थिएटर चालू झाले की, नाही. याची तीन वर्षात कधीच खात्री केली नाही. याचाच अर्थ जिल्हा आरोग्य विभागाने तीन वर्षात कधीच आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली नसल्याचे पितळ उघडे पडले आहे.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: