Saturday , December 3 2022
Breaking News

अजमीर सौंदाणे येथे जिल्हा परिषद केंद्र शाळेत मेळावा

सुराज्य न्युज / हितेंद्र दुसाने

वायगांव :- बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत दिनांक 24 मार्च 2022 रोजी केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारी संदर्भात प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला.

या प्रशिक्षण मेळाव्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख श्री. डी.जे. काकळीज यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षणाचे प्रशिक्षक ट्रेनर श्रीमती. माधुरी आहेर मॅडम व श्री पवार सर यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना सविस्तर माहिती व प्रशिक्षण दिले.
त्यानंतर शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यात केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग घेऊन विविध उपक्रमांचे स्टॉल लावण्यात आले.


तसेच कोरोना कालावधीत विद्यार्थी पूर्व प्राथमिक शाळा शिक्षणापासून वंचित होता, या वर्षी प्राथमिक शाळेत दाखल होणाऱ्या दाखल पात्र मुलांसाठी प्रशिक्षणात सांगितलेले, सर्व उपक्रम राबवण्याचे आहेत असे सांगितले. सदर प्रशिक्षणास मेळाव्यास केंद्रातील ग्रेड पात्र मुख्याध्यापक श्री बाळासाहेब कापडणीस श्री. दादाजी पगारे, तसेच केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका व अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होते.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सोमपूर येथे कृषिदुतांनी केले जैविक खता विषयी मार्गदर्शन

मनीष शेलार सटाणा प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र सटाणा(२७ नोव्हेंबर २०२२) : रासायनिक खताने जमिनीचा पोत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: