Saturday , December 3 2022
Breaking News

आदिवासी विरांगणा झलकारीबाई

रविंद्र वसावे विशेष प्रतिनिधी नंदुरबार सुराज्य न्यूज महाराष्ट्र

नंदुरबार (२३ नोव्हेंबर २०२२) : आदिवासी विरांगणा झलकारीबाई यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८३० साली झासी जवळील भोजला गावात एका गरीब आदिवासी कुटूंबात झाला.झलकारीबाई लहानअसतानाच त्याच्या आईचा मृत्यू झाला.त्यामुळे वडिलांनी त्याचे पालनपोशन केले. त्याना घोड्यांवर स्वार होणे,हत्यार चालविण्याचे प्रशिक्षण दिले.त्या लहानपणापासुनचं शुर व धाडसी होत्या.एकदा त्या जंगलामध्ये लाकडे गोळा करत असताना बिबट्या बरोबर झटापट झाली त्यनी आपल्या कु-हाडीने बिबट्याला ठार केले.तर एकदा चोरांनी गावातील एका व्यापा-यावर हल्ला केला त्यावेळी मोठ्या हिमतीने झलकारीने चोरांना पळण्यास भाग पाडले.या घटनेमुळे गावातील लोकांना त्याचा अभिमान वाटला. त्यांनी राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एका पुरन कोळी नावाच्या सैनिकाबर त्याचे लग्न लावले.पुरन शुरवीर,धाडसी होते. सा-या सैन्याला त्याचा अभिमान होता.एकदा झलकारीबाई गावातील महिलांबरोबर झासीच्या किल्ल्यात गेल्या तेथे त्याना राणी लक्ष्मीबाईने पाहिल्याबरोबर आश्चर्यचकीत झाल्या. हुबेहुब राणी लक्ष्मीबाईसारख्या दिसत होत्या. इतर महिलांनी झलकारीबाईच्या हिमतीची,धाडसाची माहिती राणीला दिली. त्यामुळे प्रभावित होऊन राणीने झलकारीबाईला दुर्गासेनेमध्ये सामिल करून सेनापती बनविले.त्याना तलवार चालविणे,बंदूक चालविणे,तोफ चालविण्याचं प्रशिक्षण दिले.झासीची सेना मजबुत झाली.ब्रिटीश सरकारने लाँर्ड डलहौजीच्या नेत्रुत्वाखाली झासीचे राज्य हडप करायला सुरूवात केली.राज्य आपल्या नियंञणाखाली आणायचे होते. राणी लक्ष्मीबाईला मुल नसल्या कारणाने उत्तराधिकारी म्हणुन दत्तक पुञ घेतले होते. ते डलहौजीने नाकारले त्यामुळे राणीने ब्रिटीशांविरूध्द लढा पुकारला त्याचे नेञुत्व झलकारीबाईने केले. ब्रिटींशांशी अनेक लढाया लढल्या .१८५७ च्या उठावा वेळी ब्रिटीश सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर हल्ला चढविला राणीच्या नेञुत्वाखाली घनघोर युध्द झाले.राणीच्या सेनेतील दुल्हेराव नावाच्या एका सेनानायकाने गद्दारी केली. त्याने किल्ल्याचे संरक्षित दरवाजा ब्रिटीश सैन्यासाठी खोलले त्यामुळे किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात जाणार हे पाहुन झलकारीबाईने राणीला काही विश्वासु सैनिक घेऊन किल्ला सोडुन पळण्यास सांगितले.राणी घोड्यावर बसुन काही सैनिकांना घेऊन किल्ला सोडुन दुर गेल्या.मग झलकारीबाईने राणी लक्ष्मीबाईचा पोशाख घालुन किल्ला लढवत राहिल्या. झलकारीबाईचे पती पुरन लढता लढता शहिद झाले.परंतु पतीचा शोक न करता ब्रिटीशांबरोबर लढत राहिल्या अखेरीस ४ एप्रिल १८५७ साली झाशीचा किल्ला लढता लढता शहिद झाल्या.झलकारीबाईने झाशीच्या राज्याबद्दल आपली स्वामीनिष्ठा दाखविली.आदिवासी विरांगणा झलकारीबाईच्या सन्मानासाठी भारत सरकारने २२ जुलै २००१ ला झलकारीबाईचे पोष्टाचे तिकीट सुरू केले.आजही उत्तरप्रदेश राजस्थान येथे झलकारीबाईचे स्मारक पहावयास मिळतात.
अशा महान आदिवासी विरांगणास !! विनम्र अभिवादन !!..

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

नाशिक मध्ये खासदार भव्य रोजगार मेळावा.

सुराज्य न्युज /अमोल चव्हाण https://forms.gle/rTFcVjCEbjoVThix9 नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री.हेमंत जी गोडसे साहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: