Sunday , November 27 2022
Breaking News

75व्या स्वतंत्र्य अमृत महोत्सव प्रसंगीं साकुरी (नि) येथे महिला सबलीकरणासाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरचे आयोजन

 

अमोल बच्छाव उपसंपादक सुराज्य न्युज

मालेगाव (१० नोव्हेंबर २०२२) – तालुका विधी सेवा समिती मालेगाव न्यायालय व मालेगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका विधी सेवा समितीचे आध्यक्ष मा. श्री. शा.भा.बहाळकर साहेब न्यायाधीश १ यांच्या मार्गदर्शनाखाली “हक हमारा भी हे, ७५ व्या विधि सेवा कायदेविषयक साक्षरता अभियान” कार्यक्रम आयोजन दि.0९/११/२०२२ रोजी. साकुरी (नि)मालेगाव येथे सकाळी ०९:०० वा.करण्यात आले.या कार्यक्रमचे आयोजन मा.श्री.शा.भा.बहाळकर जिल्हा न्यायाधीश-१, व अप्पर .सत्र न्यायाधीश, मालेगाव यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्तविक ॲड. पवन जाधव यांनी करत, मा.श्रीमती.अनुराधा.ए.पांडुळे सह दिवाणी न्यायाधीश मालेगाव यांनी गावातील जमिनी वाटप, बांधावरून होणारे छोटे वाद प्रकरण सलोख्याने समजुतीने आशा पद्धतीने मिटवता येतील. यावर तालुका विधी सेवा समिती कडून वेळोवेळी मिळणाऱ्या कायदे विषयक मदत, स्त्री बृन्ह हत्या, बालविवाह अशा समाजातील प्रथा असून यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. तर जैविकतेने भाजीपाला उत्पादन करून विक्री करणाऱ्या उमेद गटाच्या अध्यक्षा श्रीमती मनीषा इंगळे व त्यांच्या उमेद गटातील महिलांचे कौतुक केले. महिला सबलीकरण मदत यावर महिलांनाशी व ग्रामस्थांशी संवाद साधला.या शिबीराप्रसंगी मा.श्री.बाळासाहेब पाटील मालेगाव यांनी कायदे यासंबंधी गावातील ज्येष्ठ नागरिक,महिला,याच्या साठी कायदे करण्यासाठी वापरात येणाऱ्या कायदे कलमांची माहिती दिली. गावातील तंटा गावात मिटून शेजाऱ्याशी चागले संबंध प्रस्थापित करणे, साकुरी नि ता.मालेगाव गावात, कायदेविषयक या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कार्यक्रम श्री. सिरिन मेश्राम यांनी केले.तर आभार श्री.भास्कर जाधव सहायक गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांनी केले. तसेच त्यावेळी कार्यक्रमाला गावातील जेष्ठ नागरिक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सभासद व आशा सेविका, अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी असून सर्व उपस्थिताना विधी सेवा प्राधिकरण ची सेवा संदर्भातील पत्रके वाटण्यात आली. तसेच शिबिर नियोजन करण्यासाठी श्री. योगेश नेमणार व श्री.सिरीन मेश्राम, न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत लासलगाव येथे मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळा संपन्न

समाजातील गोर गरीब नागरिकांच्या हितासाठी सामूहिक विवाहाची परंपरा कायम ठेवावी – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: