Sunday , November 27 2022
Breaking News

बागलाण तालुक्यात ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र मजूर सुरळीत होणार वीजपुरवठा

अतुल विलास सुर्यवंशी तालुका प्रतिनिधी सुराज्य न्युज महाराष्ट्र

सटाणा (२८ ऑक्टोबर२०२२) राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात सातत्याने पाठपुरावा केल्याने बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव, दसवेल, निताणे व चौगाव या गावांना ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र (सबस्टेशन) मंजूर झाले आहे. यामुळे या गावातील शेतकर्‍यांना सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. या उपकेंद्रांच्या उभारणीसाठी तब्बल वीस कोटी रूपयांचा खर्च येणार असून लवकरच या उपकेंद्रांच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे, अशी माहिती बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी दिली.

याबाबत बोलताना माजी आमदार चव्हाण म्हणाल्या, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना बागलाण तालुक्यातील विजेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. तत्कालीन ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांच्याकडे सातत्याने बैठका घेऊन त्यांच्या निदर्शनास तालुक्यातील विजेच्या प्रश्नाची दाहकता आणून दिली होती. तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतीपंपांसाठी व घरगुती वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी ब्राह्मणगाव, दसवेल, निताणे व चौगाव परिसरातील ग्रामस्थ शेतकर्‍यांनी विद्युत उपकेंद्रासाठी मागणी केली होती.यापूर्वी तालुक्यातील गोळवाड येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राला मान्यता मिळाली असून लवकरच या उपकेंद्राचे काम सुरू होणार आहे. या चारही उपकेंद्रांच्या उभारणीसाठी वीस कोटी रूपयांचा खर्च येणार असून लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी महावितरण कंपनीकडे प्रयत्नशील आहे. नवीन उपकेंद्र मंजूर झाल्याने परिसरातील गावांचा विजेचा प्रश्न सुटणार असून प्रामुख्याने शेतकर्‍यांचा अधिक फायदा होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

“बागलाण तालुक्यातील वीज, पाणी, रस्ते व आरोग्य यांसह विविध प्रश्नांसाठी माजी आमदार संजय चव्हाण व मी स्वत: गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. तालुक्यातील उत्राणे व कंधाणे येथील प्रस्तावित ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राना मान्यता मिळावी यासाठी लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून हा प्रलंबित प्रश्नही मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे.”
: दीपिका चव्हाण. माजी आमदार, बागलाण

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निवडणूक २०२३ महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून सटाणा येथे भेट

विशाल आंबेकर बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र बागलाण (२१ नोव्हेंबर २०२२)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: