Thursday , December 8 2022
Breaking News

सिन्नर तालुक्यामध्ये डाळिंब बाग जळून खाक…

सुराज्य न्युज / प्रकाश शेळके सिन्नर..


सिन्नर :- सिन्नर तालुक्यातील नांदुर-शिंगोटे येथील निमोन रस्त्यालगत असलेल्या गट नंबर 257 मधील सौ संध्या अमरनाथ चकोर यांच्या मालकीची एकवीसशे झाडे असलेली डाळिंब बाग शुक्रवारी दुपारी अचानकपणे शेतामध्ये असलेल्या महावितरणच्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे पूर्णता जळून खाक झाली .
सदरच्या गट नंबर 257 मध्ये 2100 डाळिंबाची झाडे लावलेली होती त्याचप्रमाणे सदरच्या बागेमध्ये पूर्णता ठिबक सिंचन केलेले होते सदरची सात एकर बाग पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे सदरच्या शेतकऱ्यांचे पंधरा ते वीस लाख रुपये इतके नुकसान झाले असून सदरच्या नुकसानीस महावितरण कारणीभूत असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे सदरच्या शेतामधून महावितरणच्या तारा गेलेल्या असून सदरचा तारांमध्ये जे अंतर पाहिजे ते नसल्यामुळे थोडासा जरी वारा आला तरी त्यामुळेच या तारांचे घर्षण होते व शुक्रवारी वारा असल्यामुळे ते घर्षण झाले व त्यामुळे संपूर्ण डाळिंब बागेने आगीने क्षणा अर्धा मध्ये पेट घेतला त्यावेळी या परिसरातील आसपासच्या शेतकऱ्यांनी मदत करून होईल तेवढी डाळिंब बाग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र वारा असल्याकारणाने संपूर्ण डाळिंब बाग जळून खाक झाली सदरच्या बागेमधील ठिबक सिंचन त्याचप्रमाणे पाण्यासाठी टाकलेले पाईप बांबू तारा व बारे सर्व जळून खाक झाले सदरचे शेतकरी जागेवर नसल्यामुळे मोठी नुकसान झाली असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी होईल तेवढी मदत करून आसपासच्या शेताकडे जाणारी आग विझविण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे सिन्नर येथील अग्निशामक दलाला आग विझविण्यासाठी प्रयत्न केला असता कुठल्याही प्रकारचा दूरध्वनी न उचलल्यामुळे सिन्नर अग्निषमक मदत करू शकले नाही .

मात्र सदरच्या शेतकऱ्याची बाग क्षणार्धात होत्याचे नव्हते होऊन गेली त्यामुळे महावितरणकडून त्वरित या ठिकाणी पंचनामा करून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी चकोर सह शेतकरीवर्गाने केली आहे तसेच शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या तारा महावितरणने त्वरित बाजूने घ्याव्यात अथवा सदरच्या तारांमध्ये असलेला अंतराचा विचार करून त्याला काहीतरी सपोर्ट टाकून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता महावितरणने घेणे महत्त्वाचे आहे मात्र महावितरणच्या मनमानी कारभारामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या पद्धतीने पडत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे तेव्हा महावितरणच्या या गलथानपणा चा सदरच्या शेतकऱ्याला मोठा फटका बसलेला असून आसपासच्या शेतकऱ्यांनाही यामुळे धास्ती निर्माण झाली आहे तेव्हा महावितरणने त्वरित आपली माणसे पाठवून या ठिकाणांच्या सर्वच तारा दुरुस्त कराव्या व शेतकरी वर्गावर पुनश्च अशी परिस्थिती ओढवली जाणार नाही याची दक्षता घ्यावी व सदरच्या चकोर यांच्या बागेची भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: