Sunday , November 27 2022
Breaking News

सिन्नर प्रहार जनशक्ती पक्षाची डुबेरे येथे मिसळ पार्टी व डुबेरे,दापुर, दोडी गट गण दौरा संपन्न .

सुराज्य न्युज / प्रकाश शेळके

सिन्नर तालुक्यातील सर्व गट गण लढवण्याचा लढवण्याचा निर्धार.

सिन्नर-होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक संदर्भात प्रहार पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची डुबेरे येथे बैठक .या बैठकीत प्रहार पक्ष पुर्ण ताकदीने लढणार आहे.प्रहारचे पेनल उभ करणार आहेत. आदरणीय बच्चुभाऊ यांच्या आदेशानुसार ,प्रहार पक्ष अध्यक्ष अनिलभाऊ गावंढे,
,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी व नासिकचे खंबीर जिल्हा अध्यक्ष अनिलभाऊ भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीत प्रहार पक्ष सामोरे जाणार आहेत. यासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मत जाणुन घेण्यासाठी, रणनीती ठरवण्यासाठी प्रहार पक्ष सिन्नर तर्फे ३१मार्च २०२२रोजी १०वाजता डुबेरे दापुर गटातील डुबेरे येथे तालुकाध्यक्ष शरद तुकाराम शिंदेपाटील यांनी मिसळ पार्टी आयोजित केलेली होती.डुबेरे गट गणासह सिन्नर तालुक्यातील सर्व गट व गणात उमेदवार उभे करून पुर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार करण्यात आला आहेत.परंतु आदरणीय बच्चुभाऊ यांच्या सभा घेण्यात यावा अशी गळ कार्यकर्ते यांनी घातली. बच्चु यांच्या सभा होणा याची ग्वाही शरद शिंदेपाटील यांनी दिली.

प्रहारच्या सिन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व महत्त्वाचे कार्यकर्ते यांनी हजर होते.तसेच दापुर, डुबेरे, सोनारी,हरसुले, लोणारवाडी, वडगाव, भाटवाडी, कंदुरी,दोडी,गोंदे,धोंडविरनगर,आटकवडे,मुसळगाव, कुंदेवाडी, मनेगाव ,पाटोळे,ढोकी परिसरातील प्रहारचे कार्यकर्ते, हितचिंतकांनी हजर होते.डुबेरे येथील बैठक व मिसळ पार्टी संपन्न झाल्यावर गटातील पाटोळे, दापुर, आटकवडे, दत्तनगर, दोडी,गोंदे सह मनेगाव येथे दौरा करून गावातील लोकांच्या भेटी घेऊन समस्या जाणुन घेतल्या. डुबेरे, पाटोळे, मनेगाव, दोडी ,गोंदे, आटकवडे येथील ग्रामस्थ यांनी गावात पिण्याच्या पाणी प्रशन, वीज प्रश्न व बैंक,पतसंस्था, फायनान्स व एसटी प्रशन मांडले.डुबेरे, मनेगाव, दोडी,पाटोळे येथील पिण्याच्या पाणी प्रश्न गंभीर आहेत. टैंकर सुरु व्हावेत अशी गावकरी यांनी गळ घातली.पाणी प्रशनासाठी डुबेरे येथे आठ दिवसांनी प्रहार पक्षातर्फे रस्ता रोको करण्यात येणार आहेत.यावेळी शरद तुकाराम शिंदेपाटील सह शिवाजी गुंजाळ, सुनील महाराज,संदिप लोंढे, गोपाळ गायकर,भाऊसाहेब वामने,दिलीप वाजे,राहुल रुपवते,पंकज पेटारे,सुरज सानप,संजय कदम,नंदच महाराज धोक्रट,सोनु कटारे सनी रूपवते,जगदीश रुपवते,रोहित रुपवते,रामहरी माळी,समाधान गावंढे,भिका सोनवणे,राजु वाघ,जिवराम काळुंगे,अनिल शिंदे, संभाजी मोरे,चिंधुभाऊ गुंजाळ, देवा काळे,महादु सांगळे,मन्नु आव्हाड सनी वाजे,सुनील गवारे,दादा रुपवते,जगन बिन्नर,युवराज ढोली,भाऊराव शिंदे,सह युवक व ग्रामस्थ हजर होते

About प्रकाश शेळके नाशिक जिल्हा संपादक

Check Also

सिन्नर येथे सिलेंडर चा अचानक स्पोट पती- पत्नी गंभीर जखमी

श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र   सिन्नर: (८ नोव्हेंबर २०२२) – पाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: