Saturday , December 3 2022
Breaking News

सटाणा तालुक्यातील न्यायालयाच्या नविन विस्तारीत इमारतीचे बांधकाम व्हावे या मागणीसंदर्भात पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांना निवेदन

सुराज्य न्युज / अमोल बच्छाव मालेगाव

मालेगाव ÷ (दिनांक १७\०३\२०२२)
सटाणा येथील न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे बांधकाम व्हावे या मागणीसाठी सटाणा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांची भेट घेवून निवेदन दिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांच्या माध्यमातुन संपन्न झालेल्या या बैठकीप्रसंगी सटाणा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.पंडितबापू भदाणे, उपाध्यक्ष ॲड.एन.पी.चंद्रात्रे, सचिव ॲड.आर.एम.जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदिप आहिरे, वकील संघाचे सदस्य ॲड.सी.एन.पवार, ॲड.पी.के.गोसावी आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.

विधी व न्याय खाते हे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडेच असून त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून नवीन इमारतीबाबत चर्चा करून हा प्रश्न सोडवू असे आश्वासन ना.भुजबळ यांनी यावेळी दिले होते. त्यानुसार पालकमंत्री ना.भुजबळ साहेब यांच्या माध्यमातली महाविकास आघाडी सरकारने सटाणा न्यायालय ईमारतीसाठी १० कोटी ३८ लाख रुपयांचा निधीची तरतुद करुन दिली आहे.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

मालेगाव महानगरपालिकेचे खुले भूखंड गेले कुठे ?

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र   मुस्लिम उन्नती सेवा फाउंडेशन धुळे मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: