Sunday , November 27 2022
Breaking News

शिवसेना तालुका प्रमुखावर प्राणघातक हल्ला

 

सुराज्य न्युज / देविदास भामरे नामपुर

नामपूर :- ताराबाद येथील कथित भ्रष्टाचार संदर्भात दोषी ठरलेले अधिकारी व सरपंच तसेच सत्ताधारी सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांचे दिनांक 22 /3/2022 पासून पंचायत समिती बागलाण येथे आमरण उपोषण सुरू आहे, तरी रात्री बारा वाजेच्या सुमारास नंदन यांच्यावर डॉक्टर प्रशांत सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक उपोषणस्थळी येऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, नंदन यांनी वेळेच भान लक्षात घेऊन हल्ल्यातून स्वताला बजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे सहकारी या हल्ल्यात जखमी झालेत जखमींना तातडीने मालेगाव येथील खाजगी हॉस्पिटल ला ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सदर हा प्रकार बागलाण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कोल्हे व विस्तार अधिकारी  सूर्यवंशी व सावंत यांच्या समोर झाला. ही घटना तालुक्यातील शिवसैनिकांना समजतात, कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व नंदन यांना घटनेविषयी विचारपूस करून गट विकास अधिकारी  कोल्हे यांच्या दालनात आंदोलन केले, यावेळी सटाणा पोलीस ठाण्याचे पीआय अनमोलवार साहेब यांनी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु शिवसैनिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे हल्ला करणाऱ्या सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांना अखेर अटक करून शिवसैनिकांना शांत करण्यात आले. यावेळी तालुक्यातून उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे शहर प्रमुख जयप्रकाश सोनवणे राजन चौधरी समीर सावंत देवा भामरे चंदू कोर मनोहर पाटील अशोक चौधरी किरण पवार सचिन सोनवणे शरद शेवाळे अशोक नंदन संदीप साळवे भाऊ नंदन गोविंद नंदन आदी शिवसैनिक उपस्थित होते.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निवडणूक २०२३ महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून सटाणा येथे भेट

विशाल आंबेकर बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र बागलाण (२१ नोव्हेंबर २०२२)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: