Saturday , December 3 2022
Breaking News

लोणारवाडी येथे तुळजाभवानी मातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ…

 

सुराज्य न्युज / हितेंद्र दुसाने

वायगाव :- बागलाण तालुक्यातील लोणारवाडी (सुराणे) येथील तुळजाभवानी माता प्राणप्रतिष्ठा सोहळास २७ मार्च पासून प्रारंभ झाली आहे. रविवार सकाळी मांडवा ची मिरवणूक काढून मांडव मंदिरापुढे टाकण्यात आला,

त्यानंतर ट्रॅक्टर नारळाच्या पानांनी सजवून ट्रॅक्टरवर तुळजा मातेची मूर्ती ठेवून,गुलाल उधळून, वाजत गाजत जल्लोषात मूर्तीची एक किलोमीटर अंतरापर्यंत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील प्रत्येक घरासमोर गुढी उभारण्यात आली. तसेच दारा समोरून अंगणात सडा रांगोळी काढण्यात आली. त्याच प्रमाणे दारा समोरून मिरवणूक जातांना प्रत्येक सुवासिनींनी मूर्तीची आरती ओवाळून पूजा केली,

मिरवणुकीत ग्रामस्थांचा महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला मिरवणुकी नंतर दुपारी पूजा कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी गणपती पूजनासह विविध देवतांची पूजा करण्यात आली, सायंकाळी आरती करण्यात आली. यावेळी सर्व ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सोमपूर येथे कृषिदुतांनी केले जैविक खता विषयी मार्गदर्शन

मनीष शेलार सटाणा प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र सटाणा(२७ नोव्हेंबर २०२२) : रासायनिक खताने जमिनीचा पोत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: