Saturday , December 3 2022
Breaking News

मालेगाव तालुक्यातीळ खाकुर्डी गावात शिवजयंती निमित्त शिवतीर्थ येथे दीपोत्सवाचे आयोजन …..

 

सुराज्य न्युज / काकासाहेब साळुंखे

मालेगाव :-एक ज्याेत चारित्र्याची…एक ज्याेत निष्ठेची.. एक ज्याेत गड संवर्धनाची….अशा शेकडाे ज्याेतींनी खाकूर्डी येथील शिवस्मारक उजळून निघाले हाेते.

फाल्गुन वद्य तृतीया तिथीनुसार साजऱ्या हाेणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्थान मालेगाव च्या वतीने सोमवार (ता.२१) सायंकाळी दिपाेत्सवाच्या आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने शिवस्मारक उजळुन निघाले हाेते.
दिपाेत्सवा दरम्यान, गावातील शिवभक्त, भगिनी व खाकुर्डी ग्रामस्थांनी सहभाग घेतला तसेच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान मालेगाव विभाग अध्यक्ष प्रवीण भामरे यांनी सह्याद्री च्या कार्याची माहिती देत दुर्गसंवर्धन करणे काळाची गरज आहे यात प्रत्येक व्येक्तीने कर्तव्य म्हणून सहभाग घेतला पाहिजे..तरच आपण आपल्या बापजाद्यांचा इतिहास आपल्या येणाऱ्या पिढी पर्यंत पोहचू शकू असे ते म्हणाले व या दुर्गसंवर्धन महायज्ञात सहभागी व्हा असे तरुणांना आव्हान देखील केले.
दिपाेत्सवात चेतन सोनवणे, कृष्णा गांगुर्डे, राकेश बच्छाव, शेखर खैरनार,चंद्रकांत काकुळते,तेजस काकुळते,विशाल भामरे,गौरव वाघ आदी दुर्गसेवक उपस्थित होते…

 

About नितीन लांडगे संपादक

Check Also

मालेगाव महानगरपालिकेचे खुले भूखंड गेले कुठे ?

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र   मुस्लिम उन्नती सेवा फाउंडेशन धुळे मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: