Thursday , December 8 2022
Breaking News

नामपुर बाजार समिती लिलाव खुल्या पद्धतीने घेण्यात यावा

 

सुराज्य न्युज/ देविदास भामरे नामपुर

नामपुर:- कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर च्या मार्केट यार्ड वरील कॅन्टीन शेणखत काडीकचरा पानपट्टी मुख्य मार्केट यार्ड नागपूर व उपबाजार करंजाड येथील आवारातील वाहनातून खाली पडलेला कांदा परत वाहनात भरणे इत्यादी बाबींचा दिनांक 1/4/2022 ते 1/4/2023 या कालावधीसाठी द्यायचा आहे तो इच्छुकांनी बंद पाकिटात निविदा रक्कम व डिपॉझिट रक्कम भरून दिनांक 28/3/2022 पर्यंत सायंकाळी सहा वाजेच्या आत जमा करण्याबाबत लिलाव नोटीस प्रसिद्ध झालेली आहे.
परंतु सदर लिलाव हा बंद पाकिटात न घेता खुल्या पद्धतीने घेतला जावा तसेच आर्थिक परिस्थिती व वाढत्या बेरोजगारीच्या दृष्टीने पाहता बयाणा रक्कम ऐंशी टक्के न भरता 50 ते 60 टक्के पर्यंत करावी व सर्व सामान्य जनतेचा सदर लिलावासाठी पूर्ण विचार व्हावा अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी व नागरिक करीत आहेत तरी या मागणीचे निवेदन नामपुर शिवसेनेच्यावतीने देण्यात आलेले आहे सदर मागणीचा विचार न करता निर्णय झाल्यास सदर घटना ही लोकशाहीच्या विरोधी आहे असे समजून शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याचे परिणामास बाजार समिती जबाबदार राहील. अशा पद्धतीचे निवेदन बाजार समिती संचालक मंडळास व सचिवास देण्यात आले यावेळी शिवसेनेचे संघटित असंघटित उत्तर महाराष्ट्र कामगार सेना प्रमुख विनोद सावंत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख समीर सावंत, देवा भामरे शहर प्रमुख मनोहर पाटील युवा सेना प्रमुख किरण पवार स्वप्निल भामरे गटप्रमुख अशोक सूर्यवंशी विकी राज वसंतराव सावंत डॉक्टर सतीश देसले सुनील गोपीचंद खैरनार मंथन कुमावत मुन्ना सूर्यवंशी इम्रान पठाण आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: