Sunday , November 27 2022
Breaking News

दहा हजार रुपयांची लाच घेताना नामपूर येथील जमादारास अटक

सुराज्य न्युज / सतिश कापडणीस

नामपूर:-नामपूर दूरक्षेत्र येथे कार्यरत असलेल्या सपोउनि जगन्नाथ महाजन १० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांनी रंगेहाथ पकडले आहे.गून्ह्यातील नाव काढण्यासाठी तक्रारदाराकडे ४० हजारांची लाचेची मागणी केली होती.तडजोडीअंती १० हजारांची लाच स्वीकारताना पकडले नामपूर दूरक्षेत्र येथे ४ वाजता अटक करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी जगन्नाथ महाजन याने तक्रारदाराकडून दाखल गून्ह्यात मदत करण्यासाठी ४०, ६०० रूपये रक्कमेची मागणी केली होती.तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती दि.२६ दुपारी चार वाजता नामपूर दूरक्षेत्र येथे सापळा रचून १० हजारांची लाच स्वीकारताना महाजन यास अटक करण्यात आली.त्यानंतर लाचलुचपत विभागाने विभागाने महाजन यास ताब्यात घेतले असून.त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक परिक्षेत्र सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान वाघ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार, पोलीस हवालदार उत्तम महाजन,विजय ठाकरे, पोलीस नाईक देवराम गावित, मनोहर अहिरे यांनी सापळा यशस्वी केला

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निवडणूक २०२३ महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून सटाणा येथे भेट

विशाल आंबेकर बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र बागलाण (२१ नोव्हेंबर २०२२)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: