Thursday , December 8 2022
Breaking News

तहसील कार्यालयात उपोषणास बसलेल्या सौ.वाघ यांची तब्बेत खालावली; लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन अजून तीव्र करण्याचा वाघ परिवाराकडून इशारा

 

सुराज्य न्युज / अमोल बच्छाव मालेगाव

मालेगाव:-कळवाडी येथील शेतकरी सहकारी संघाने स्वस्त धान्य विक्रीसाठी सेल्समनपदी नियुक्ती केली असतांनाही तहसिलदारांकडून अनेक प्रकारच्या चौकशी व  अहवालाच्या फेरात अडकून अधिकारापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप कल्पना वाघ व सचिन यांनी कुटुंबांसह पत्रकार परिषद घेऊन केला होता.

निर्णय न झाल्यास सामूहिक आत्महत्या करण्याच्य इशाराही वाघ माता पुत्राने दिला होता. परंतु कालपासून कल्पना वाघ  त्यांच्या कुटुंबियांसह तहसीलदार यांच्या विरोधात आमरण उपोषणाला बसले आहेत, आज दुसरा दिवसही पलटुन गेला असता तहसीलदार यांच्याकडून  कुठलही उत्तर देण्यात आले नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. तसेच कालपासून अन्नाचा कण ही न घेल्यामुळे सौ कल्पना वाघ यांची प्रकृती खालावली असून सौ. वाघ यांना तहसील ऑफिस शेजारी असणाऱ्या कलावती लाईफ केयर या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे व कुटुंबातील इतर सदस्य उपोषणाला बसले आहे, अजूनही तहसीलदार यांना जाग आलेली नाही का? असा प्रश्न उपोषण कर्तांनी विचारला असून तहसीलदार यांचा निषेध व्यक्त केला.

सौ वाघ यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तरीही परिवार मात्र आंदोलनावर ठाम असुन रात्रीही सह परिवार मुक्काम सुरू ठेवल्याने प्रशासनासमोर आंदोलनकर्त्यांचे मोठे आव्हान ठाकले असून लवकरात लवकर तोडगा काढून दुकान सौ. वाघ यांच्या ताब्यात देण्याची मागणी होत आहे.

पुढील आंदोलन अजून तीव्र करणार असल्याचे सचिन वाघ यांनी सांगितले.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: