Thursday , December 8 2022
Breaking News

तरसाळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील महिला व मुलींसाठी शिवणकाम प्रशिक्षण शिबीर

सुराज्य न्युज / एकनाथ अहिरे

विरगाव:- तरसाळी ता.बागलाण ग्रामपंचायतीच्या वतीने गावविकासासाठी व स्वयंरोजगारासाठी व नेहमी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात त्यानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील महिला व मुलींसाठी शिवणकाम प्रशिक्षण शिबीर राबविण्यात आले, गावातील ३२ प्रशिक्षणार्थी महिला व मुलींनी शिबिराचा लाभ घेतला, आज शनिवार दि.९ रोजी भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, शेतकरी मित्र बिंदू शर्मा व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे हस्ते प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र व शिवणकामासाठी लागणाऱ्या साहित्य किटचे वाटप करण्यात आले, याप्रसंगी बिंदुशेठ यांनी मनोगत व्यक्त करताना स्वयंरोजगार हि काळाची गरज असुन, महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिबिर आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले,व तिन गरजु महिलांना मशिन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली, तसेच बिंदू शर्मा यांना गिरणा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल तरसाळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला, ग्रामपचायतीच्या वतिने राबविण्यात येणारे विविध उपक्रमाची माहिती व कार्यक्रमांचे सुत्रसंचालन मा.सरपंच लखन पवार यांनी केले, यावेळी सरपंच मंगलबाई मोहन, उपसरपंच नामदेव बोरसे, ग्रा.प.सदस्य लखन पवार,काळु पिंपळसे, दिपक रौंदळ, कमल गांगुर्डे,निंबाबाई माळी,अनिता रौंदळ,अर्चना रौंदळ, ग्रामसेवक एन.एम.देवरे, तंटामुक्ती अध्यक्ष राकेश रौंदळ, उपाध्यक्ष पुंडलिक रौंदळ, वनसमिती अध्यक्ष प्रभाकर पवार, भिका रौंदळ, सुधाकर पाटील, पंडित रौंदळ, प्रंशात मोहन, जगदिश रौंदळ, देवाजी वाघ, दिनकर महिरे,नानाजी पवार, मुन्ना जाधव, तुळा रौंदळ, मोठाभाऊ बागुल, पिंकु रौंदळ, हिरामण जाधव, रोहिदास सोनवणे, शिवाजी सोनवणे, नाना गोसावी,साहेबराव रौंदळ, चिंधा पिंपळसे, प्रियंका रौंदळ, साक्षी रौंदळ, बंटी चव्हाण, सपना माळी, मनिषा वाघ, सारिका रौंदळ, ललिता जाधव गौरव मुसळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: