Sunday , November 27 2022
Breaking News

चापडगाव शाळा पूर्वतयारी अभियान शाळेतील पहिले पाऊल उद्घाटन समारंभ

सुराज्य न्युज, सतीश आव्हाड

चापडगाव शाळा पूर्वतयारी अभियान शाळेतील पहिले पाऊल उद्घाटन समारंभ*

आज दिनांक 19-4-2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चापडगाव येथे शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक 1 साजरा करण्यात आला. राज्यात सन 2020-21 पासून स्टार्स प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून त्याअंतर्गत *शाळा पूर्वतयारी अभियान उपक्रमाची* अंमलबजावणी करण्यात येत आहे .या उपक्रमात इयत्ता पहिली दाखल पात्र विद्यार्थ्यांसाठी 7 स्टॉलची मांडणी करण्यात आली होती. यामध्ये क्रमांक 1) दाखल पात्र विद्यार्थी नाव नोंदणी 2) शारीरिक विकास 3) बौद्धिक विकास 4) सामाजिक व भावनात्मक विकास 5) भाषा विकास6) गणन पूर्व तयारी 7) स्मार्ट पालक आभार व मार्गदर्शन स्टॉलची मांडणी केली गेली होती .प्रथमतः इयत्ता पहिली दाखल पात्र विद्यार्थ्यांची बैलगाडीतून वाद्य, लेझीम पथक, टाळ पथकासह मिरवणूक काढण्यात आली. यानंतर शाळेत पहिले पाऊल टाकताना विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले .गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून स्वागत गीताने त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात इयत्ता पहिली दाखल पात्र विद्यार्थी व त्यांचे पालक आणि उपस्थित मान्यवरांनी स्टॉलला भेटी देऊन प्रत्येक स्टॉलची माहिती घेतली यात मुलांचे वजन, उंची मोजण्यात आली. विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करून घेण्यात आली. शारीरिक विकासासाठी विविध खेळ घेण्यात आले. तसेच बुद्धीला चालना देणारे खेळही घेण्यात आले .उपलब्ध साहित्याच्या सहाय्याने भाषा पूर्वतयारी व गणनपूर्व तयारी ही घेण्यात आली .स्मार्ट पालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश इयत्ता पहिली दाखल पात्र विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घेणे तसेच पालकांची जनजागृती करणे, जून महिन्यातील दुसरा मेळाव्यात विद्यार्थ्यांची प्रगती कशी करून घ्यावी याविषयी मार्गदर्शन करणे असा होता .आजच्या दिवशी नऊ विद्यार्थ्यांची नाव नोंदणी झाली. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता-पालक, शिक्षक पालक सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, प्रतिष्ठित ग्रामस्थ, पहिली दाखल पात्र विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About चंद्रकांत आहिरे

Check Also

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निवडणूक २०२३ महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून सटाणा येथे भेट

विशाल आंबेकर बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र बागलाण (२१ नोव्हेंबर २०२२)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: