Saturday , December 3 2022
Breaking News

क्रांतिवीर सेवक पतसंस्था चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड

सुराज्य न्युज / प्रकाश शेळके

सिन्नर :- क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेची  पंचवार्षिक निवडणूक संस्थेचे अध्यक्ष श्री पंढरीनाथ थोरे साहेब,उपाध्यक्ष श्री पि आर गिते साहेब सरचिटणीस व नामको बँकेचे चेअरमन श्री हेमंत आप्पा धात्रक,सहसरचिटणीस श्री तानाजी आप्पा जायभावे सर्व विश्वस्त सर्व संचालक यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली. आज पतसंस्थेच्या कार्यालयात पदाधिकारी निवडीसाठी सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी निवडणूक अधिकारी श्रीमती प्रेरणा शिवदास व सहायक निवडणूक अधिकारी श्री सचिन काकड यांच्या उपस्थितीत चेअरमन पदासाठी श्री प्रदिप सांगळे यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली तसेच व्हा चेअरमन पदासाठी श्री रावसाहेब आव्हाड यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी व संस्थेचे उपाध्यक्ष श्री पी आर गिते साहेब सरचिटणीस व नामको बँकेचे चेअरमन श्री हेमंत आप्पा धात्रक यांच्या हस्ते श्री प्रदिप सांगळे सर व श्री रावसाहेब आव्हाड यांचा व नूतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.
या पाच वर्षांसाठी संचालक म्हणून श्री प्रदिप सांगळे,श्री एकनाथ भाबड,रवींद्र काकड,केशव आघाव,जयंत धात्रक,रावसाहेब आव्हाड,दिपक इप्पर,राजेंद्र गिते,प्रा संतोष भैलूमे सर, महिला प्रतिनिधी म्हणून श्रीमती सुवर्णा नागरे,श्रीमती रोहिणी गामणे इ निवड करण्यात आली
वरील सर्व नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाचे संस्थेचे सर्व पदाधिकारी,विश्वस्त,आणि संचालक व संस्थेचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया- क्रा व्हि एन नाईक सेवक पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड केल्या बद्दल संस्थेच्या सर्व पदाधिका रयांचे व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आभार पतसंस्थेचा कारभार बघत असतांना सभासदांचे हित व आर्थिक बचत करून संस्था नावारूपास नेण्याचा प्रयत्न करीन संस्थेत ठेवी वाढविण्याचा व सभासदांना वेळेवर नियमात कर्ज वाटपाचा प्रयत्न राहील
श्री प्रदिप सांगळे
चेअरमन
के व्हि एन नाईक सेवक पतसंस्था
श्री रावसाहेब एकनाथ आव्हाड
व्हा. चेअरमन
के. व्ही. एन.नाईक पतसंस्था नाशिक

About नितीन लांडगे संपादक

Check Also

नायगाव येथील जनता विद्यालयात विज्ञान प्रदर्शनात भरली बाल वैज्ञानिकांची जत्रा

सुराज्य न्युज / मंगेश कातकाडे सिन्नर:मविप्र संचालित नायगाव येथील जनता विद्यालयात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: