Thursday , December 8 2022
Breaking News

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याशी बंगलोर येथे कर्नाटक राज्यातील मराठा समाजाला च्या विविध प्रश्‍नावर चर्चा:

सुराज्य न्युज / प्रकाश शेळके

सिन्नर:-आदरणी शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याशी बंगलोर येथे कर्नाटक मधील मराठा समाजाच्या विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.प्रमुख्याने विषय 1) होदगिरे येथील स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे यांच्या समाधीस्थळी भव्य स्मारक उभारणे 2) कनकगिरी येथे छत्रपती संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू यांची समाधी असून तेथेही भव्य स्मारक व्हावे. ३) कर्नाटक सरकारने सारथी सारखी संस्था काढून कर्नाटक मधील मराठा समाजाच्या मुला-मुलींना स्पर्धा परीक्षा विविध नोकऱ्यांच्या मार्गदर्शन चालू करणे तसेच कर्नाटक सरकारने मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठा विकास मंडळ स्थापन केले असून त्या मंडळाला 50 कोटी रुपये निधी देऊन स्वायत्त संस्था दर्जा देणे. 4) बसरुर (उडपी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराच्या साह्याने पोर्तुगीज विरुद्ध लढाई जिंकली होती. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे जनक म्हणून विजय स्तंभ व स्मारक व्हावे व इतर मागण्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मागण्यांचा समावेश करून ह्या मागण्या पूर्ण कराव्या यासंदर्भात पंचवीस मिनिटे साहेबांशी चर्चा झाली. साहेबांनी होदिगेरे येथे समाधीस्थळी येण्याचे मान्य करून सर्व मराठा संघटनांनी एकत्र कार्यक्रम घेतलास कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले आहे . यावेळी छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर प्रदेश सरचिटणीस योगेश जी केवारे, स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे स्मारक सल्लागार समिती महाराष्ट्र शासन वेरुळचे तांत्रिक सल्लागार प्रा. डॉ. आर. एम. दमगीर पाटील शिष्टमंडळात समावेश होता.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: